Shiv Bhojana Scheme Beneficiary Fraud In Ratnagiri Kokan MArathi News 
कोकण

शिवभोजन योजनेला उद्‌घाटन होऊन एक दिवस झाला नाही, तोवर....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिवभोजनातील बोगस लाभार्थी प्रकरणी चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. लवकरच ही समिती जिल्हा रुग्णालयातील केंद्राची चौकशी करून याचा अहवाल जिल्हा अन्न व पुरवठा विभागाला सादर करणार आहे. त्यामुळे बोगस लाभार्थी प्रकरण डी. एम. एंटरप्रायजेसला भोवण्याची शक्‍यता आहे.  

शिवभोजन थाळीचे उद्‌घाटन २६ जानेवारीच्या मुहूर्तावर पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते झाले.  उद्‌घाटन होऊन एक दिवस झाला नाही, तोवर या योजनेतील बोगस लाभार्थ्याचे प्रकरण पुढे आले. या प्रकरणाची जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी नायब तहसीलदार श्रुती सावंत यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नेमका काय प्रकार आहे हे चौकशीमध्ये स्पष्ट होणार आहे.

उद्‌घाटन होऊन एक दिवस झाला नाही, तोवर....

गरीब आणि गरजू लोकांसाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळीचे उद्‌घाटन केले. रत्नागिरी शहराला मंगला हॉटेल, रेल्वे स्थानक आणि जिल्हा शासकीय रुग्णालय अशी केंद्रे मिळाली आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० थाळ्या दिल्या जाणार आहेत. केंद्र सुरू ठेवण्याची वेळही निश्‍चित केली आहे. कालच या केंद्रावर बोगस लाभार्थ्यांचा प्रकार उघड झाला. याची जिल्हा पुरवठा विभागाने दखल घेऊन तत्काळ एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

जेवण वाढण्याऱ्यांनीच केले....

जिल्हा रुग्णालयातील केंद्राचा ठेका डी. एम. एंटरप्रायजेसला दिला आहे. या एजन्सीमधील दोन महिला कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या रांगेत उभे राहून शिवभोजन थाळीचे कुपन घेतले. कुपन घेतल्यानंतर याच दोन्ही महिला किचनमध्ये जेवण वाढण्याचं काम करताना आढळून आल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT